RajThackeray : दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका ठेवत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर केंद्र सरकारने 5 वर्षांची बंदी घातली आहे. केंद्र सरकारने याबाबतच रितसर अध्यादेश देखील जारी केला आहे. त्यावर देशातून विविध प्रतिक्रिया उमटत असल्याचं पहायला मिळालं. त्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (After banning PFI, Raj Thackeray welcomed Amit Shah's decision breaking news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत अमित शहा यांचं अभिनंदन देखील केलं. PFI ह्या देशविघातक आणि देशद्रोही संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने घालण्यात आलेली बंदी योग्य असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.


नेमकं काय म्हणाले राज ठाकरे-


PFI ह्या देशविघातक आणि देशद्रोही संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली, ह्याचं मी मनापासून स्वागत करतो. पुढे सुद्धा अशी कीड जेंव्हा जेंव्हा तयार होईल तेंव्हा तेंव्हा ती तात्काळ समूळ नष्ट करायला हवी. गृहमंत्री अमित शाह ह्यांचं अभिनंदन, असं ट्विट राज ठाकरे यांनी केलंय.


पाहा ट्विट-



दरम्यान, केंद्रीय यंत्रणांनी संयुक्तपणे 22 सप्टेंबर रोजी देशभरात केलेल्या  कारवाईच्या पहिल्या फेरीत PFI शी संबंधित 106 लोकांना अटक केली होती. त्यानंतर या लोकांच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा आणि त्यासंबंधित व्यक्तींची नावे समोर आली.