अकोले : लग्न ही अशी गोष्ट आहे. जेथे दोन वेगवेगळे व्यक्तीच नाहीतर दोन कुटुंबही एकत्र येतात. एका महिलेसाठी लग्नानंतर तिचा नवराच सगळं काही असतो. परंतु अनेकदा काही कारणामुळे लग्नानंतर अगदी काही काळातच नवऱ्याचे निधन झाल्यामुळे बायकोवर काळाचा घाव होतो. अशा घटनेनंतर बायका एकट्या पडतात आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडते. परंतु एकट्या महिलेला कोणाच्याही आधाराशिवाय घर सांभाळणे कठीणच जाते. समाजात लोकं यासगळ्याकडे बघ्याची भूमिका घेतल्याशिवाय काहीही करु शकत नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु नवऱ्याच्या मृत्यूनंतर महिलेच्या दुसऱ्या लग्नाबद्दल कोणी कधी का विचार करत नाही? बायकोच्या मृत्यूनंतर नवरा दुसरं लग्न करु शकतो मग महिला का नाही? परंतु आता ही मानसिकता कुठेतरी बदलताना दिसत आहे. याचं एक उदाहरण लोकांसमोर ठेवलंय अहमदनगरमधील समाधान शेटेनं.


अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील समाधान शेटेनं आपल्या मोठ्या भावाच्या निधनानंतर आपल्या विधवा वहिनीचा हात धरत. तिच्या आयुष्यात आशेचा नवीन किरण आणला. समाधानने नुसतंच भावाच्या बायकोला नाही. तर त्याच्या 19 महिन्याच्या मुलीचे म्हणजेच आपल्या पुतणीची जबाबदारी ही स्वीकारली आहे. या घटनेची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.


मोठा भाऊ निलेश शेटे याचे 23 वर्षीय पूनमसोबत विवाह झाला होता. या दोघांना 19 महिन्यांचं बाळ देखील आहे. निलेश शेटे हा  हिरपाडा, जव्हार येथे आश्रमशाळेत सेवेत होता. तेथील आश्रमशाळेतील मुले, शिक्षक कोरोनाबाधित झाले. त्यात निलेशलाही कोरोनाची बाधा झाली. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.


खरेतर कोरोना झाल्यानंतर निलेश सगळ्यातून सावरला होता. परंतु यादरम्यान त्याच्या मेंदुमध्ये गाठ झाली, ज्यामुळे रुग्णालयात उपचार घेतानाच त्याचा 14 ऑगस्ट 2021 रोजी मृत्यू झाला.


नवऱ्याच्या मृत्यूनंतर पूनम आणि तिच्या बाळाचं आयुष्य अंधारात दिसू लागलं. हे समाधानला सहन झाले नाही.


अखेर समाधानने घरच्यांना बोलावून तसेच पुनमच्या घरच्यांना संपूर्ण बाजू समजवत पुढाकार घेतला. अखेर दोन्ही बाजूच्या घरच्यांच्या संमतीने पूनम आणि समाधान यांनी 30 जानेवारी 2022 रोजी लग्न केलं आणि सगळ्या जगासमोर एक उदाहरण ठेवलं.