Uddhav Thackeray :  शिक्षक आमदार कपिल पाटील आज जेडीयूला सोडचिठ्ठी दिली. नितिश कुमार पुन्हा NDAमध्ये गेल्यानं कपिल पाटील नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे. समाजवादी विचारसरणीच्या लोकांना, विचारवंतांना सोबत घेऊन त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी समाजवादी गणराज्य पार्टी या नव्या पक्षाची घोषणा केली आहे.   


हुकूमशाहीचा पहिला पराभव महाराष्ट्र करेल - उद्धव ठाकरे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हुकूमशाहीचा पहिला पराभव महाराष्ट्र करेल, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केलाय. ही लढाई उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान व्हायचं म्हणून नव्हे तर ही लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. नितीश कुमार भाजपमध्ये गेल्यानंतर आमदार कपिल पाटील यांनी जेडीयूची साथ सोडत समाजवादी गणराज्य पार्टी या नव्या पक्षाची स्थापना केली. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत या पक्षाची स्थापना करण्यात आली. भाजपविरोधात जनतेत मोठा असंतोष आहे. मात्र, तरीही ईव्हीएम घोटाळा करुन भाजप जिंकल्यास देशात भडका उडेल असा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. तर, पराभव दिसू लागल्यानं उद्धव ठकरेंनी हा आरोप केल्याचं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला.


नितीन गडकरींना पहिल्या यादीत स्थान का नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल


कृपाशंकर सिंहांच्या उमेदवारीवरुन उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावलाय. बेहिशोबी संपत्ती गोळा केल्याचा आरोप झालेल्या कृपाशंकर सिंहांचं नाव भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत आहे. मात्र, निष्ठावान नितीन गडकरींना पहिल्या यादीत स्थान नाही अशी टीका त्यांनी भाजपवर केली. 


उद्धव ठाकरे यांनी केले कपिल पाटील यांचे अभिनंदन


उद्धव ठाकरे यांनी केले कपिल पाटील यांचे अभिनंदन केले आहे. समाजवादी आणि हिंदुत्ववादी एका व्यासपीठावर कसे असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. आता लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी होणार आहे. माजलेली लोक पाहिजेत की समाजवादी म्हणजे तुम्हाला समजून घेणारी लोक पाहिजेत. नितेश कुमार, अशोक चव्हाण ही लोक आम्हाला सोडून जातील असं वाटलं नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. 50 हजार करोड से बिहार का कुछ होने वाला नही. असं म्हणत सव्वा लाख कोटी पॅकेज नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल होते. नरेंद्र मोदी यांच्या भूलथापांना बळी पडलो. गेल्या दहा वर्षात फक्त नामांतर झाली. 


जुमल्याच नाव आता ह्यांनी गॅरंटी केलं. तुम्ही कितीही खा काही करा भाजपात या तुम्हाला काही होणार नाही ही त्यांची गॅरंटी. अब की बार भाजप तडीपार. कसे 400 पार होतात ते बघतो. भाजपच्या हिंदुत्वात आणि आमच्या हिंदुत्वात फरक आहे. आमचे हिंदुत्व हे गाडगेबाबांचे हिंदुत्व आहे. केंद्र सरकारच्या सगळ्या योजना फसव्या आहेत. शेतकरी कामगार विद्यार्थी सगळे आक्रोश करत आहेत. सगळ्यांच्या मनात एक प्रश्न ईव्हीएम च काय होणार ? ईव्हीएम मध्ये घोटाळा करतील आणि ते जिंकतील. अशी लोकांमध्ये चर्चा आहे. ईव्हीएम घोटाळा भाजपने केला तर जनतेमध्ये असंतोष भडकेल असं उद्धव ठाकरे म्हणाले.