Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेच्या यशा नंतर आता शिवसेनेची “लाडकी भेट, कुटुंब भेट.” मोहीम राबवली जाणार आहे. शिवसैनिक आता महाराष्ट्राच्या प्रत्येक घरा घरात पोहचणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: मोहीमेंतर्गत घरा घरात जाऊन कुटुंबांना भेटी देणार आहेत. प्रत्येक घरातील मुली आणि महिलांसह घरातील इतर सर्व सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मीळतोय की नाही तसेच ज्यांना लाभ मिळाला नसेल त्या कुटुंबाला तात्काळ लाभ मिळवुण देण्यासाठी शिवसैनिक प्रशासकिय कागदपत्रांची पूर्तता करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील दिड कोटी महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शिवसेनेचे शिवसैनिक वाडी, वस्ती आणि गाव स्तरावरील प्रत्येक शिवसैनिक दररोज दहा घरांमधील महिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना विविध योजनेचा लाभ मिळाला की नाही  याची माहीती घेणार ज्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला नसेल तर त्यांना तात्काळ त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणार.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिकांना आदेश… प्रत्येक घरात जाऊन कुटुंबातील सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय की नाही हे पहायचे आणि ज्यांना लाभ मिळत नसेल त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तात्काळ प्रयत्नं करायचे आहे. 


लाडकी बहीण योजने नंतर आता शिवसेना “लाडकी बहीण, कुटुंब भेट” ही मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेत शिवसेनेचे प्रत्येक मतदार संघातील कार्यकर्ते दिवसाला 10 घरी भेट देणार आहेत, या भेटीत कटुंबाच्या समस्या जाणून घेतली जाणार आहे. दिड कोटी महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाले. योजनेची अंमलबजावणी, नवी नोंदणी, इतर ज्येष्ठ नागरिक, आणि युवकांच्या पर्यंत योजना पोहचल्या पाहिजेत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः नागरिकांना घरी भेट देणार आहेत. लाडकी बहिण, कुटुंब भेट योजनेंतर्गत शिवसैनिक दररोज 10 कुटुंबाना भेट देणार आहेत. 10 दिवसात 100 कुटुंबाना शिवसैनिक भेटणार आहेत. .


राज्य सरकारच्या लोकप्रिय योजना


१) लाडकी बहीण योजना
२) लाडकी लेक योजना
३) वयश्री योजना
४) शेतकऱ्यांसाठी मोफत वीज-बील योजना 
५) युवा कार्य प्रशिक्षण योजना
६) मोफत अन्न पुर्णा योजना