लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा जोर वाढला
या बैठकीत मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचे स्वागत करण्यात आले.
मुंबई : मराठा आरक्षणानंतर आता लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा जोर वाढला आहे. राज्य सरकारने १५ नोव्हेंबरपर्यंत लिंगायत आरक्षणावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तारीख उलटून गेल्यानंतर काहीही निर्णय सरकारने घेतला नाही. त्यामुळे सरकारने ०१ डिसेंम्बरपर्यंत लिंगायत समाजाला आरक्षण जाहीर न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा लिंगायत महासंघाने लातूरमध्ये घेतलेल्या बैठकीत दिला आहे. या बैठकीत मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचे स्वागत करण्यात आले.
मात्र सरकार लिंगायत आरक्षणाबाबत उदासीन का असा सवाल ही यावेळी लिंगायत आरक्षण कृती समितीने उपस्थित केलाय.
मुस्लिमांनाही आरक्षण द्या
पुण्यातील बोपोडी भागात आरक्षणासाठी मुस्लिम संघटनांनी आंदोलन केलं.
मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलनाची जशी तारीख जाहीर केली तशी मुस्लिम आरक्षणाचीही करा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. हिवाळी अधिवेशनात मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांचा रस्ताही अडवला.
धर्माच्या आधारावर आरक्षण
आंदोलकांना रास्ता रोकोची परवानगी देण्यात आली नसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका घेतल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.