पुणे : Coronavirus : राज्यातील आणखी दोघा आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस आमदार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. (After MLA Dhiraj Deshmukh, MLA Rohit Pawar got corona positive)



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार धीरज देशमुख यांनी आपली कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असल्याचे म्हटले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने सध्या पुढील उपचार घेत असल्याचे ट्विट धीरज देशमुख यांनी केले आहे. तसेच आमदार रोहित पवार यांनीही मला कोरोनाने गाठलंय, असे म्हटलं आहे.




रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. यात ते म्हणलात, तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचे काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत!