नागपूर : कोरोनाची साखळी मोडून काढण्यात अपयश येत आहे. त्यामुळे करोना रुग्णांची संख्या १०० वर पोहोचली आहे. आज आणखी दोन कोरोना पॉझिटीव्हचे रुग्ण वाढेल आहेत. एम्समध्ये ५२ पुरुषांचा रिपोर्ट तर निरीच्या प्रयोग शाळेत ५० वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  त्यामुळे चिंता वाढत आहे. दरम्यान, सतरंजीपूरा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. याठिकाणी १५० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सतरंजीपुरा आणि आजूबाजूच्या परिसरात तब्बल ५६ रुग्ण आहेत. त्यातच आता १५० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. नागपुरात पुन्हा एक कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. मोमीनपुरा परिसरातला ५२ वर्षीय पुरुष कोरोना संक्रमित असल्याचे चाचणी अहवालामध्ये समोर आले आहे. संबंधित रुग्ण आधीच आमदार निवासात क्वारांटाईन होता. दरम्यान, जबलपूरच्या काही मरकजमधून परतलेल्या कोरोना संक्रमित रुग्णांच्या संपर्कात तो आल्यामुळे त्यालाही कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी नागपुरात एकूण संक्रमित रुग्ण संख्या ९९ झाली आहे.



दरम्यान, त्याआधी नागपुरात कोरोना बधितांच्या वाढत असलेल्या संख्येला महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे जबाबदार आहे, असा आरोप महापौर संदीप जोशी यांच्या  केला होता. याला आयुक्त मुंढे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोरोना आजारावर मात करण्यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शन तत्वानुसार आम्ही काम करतो आहोत, त्यामुळे या आरोपात काही तथ्य नसल्याचं सांगत त्यांनी हे आरोप खोडून काढले आहे. 
 
तर दुसरीकडे उपराजधानीत रुग्ण वाढत असताना राज्यात तब्बल ७७८ नवीन रुग्ण आढळले आहेत. यात नेहमीप्रमाणे मुंबईचे सर्वाधिक रुग्ण आहे. विशेष म्हणजे मुंबईतही दिवसभरातले सर्वाधिक रुग्ण गुरुवारी आढळले आहेत. मुंबईत नवीन ५२२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर गेल्या ३६ तासांत राज्यात १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे.