शाळा सुरु झाल्या, आता कॉलेज संदर्भात महत्वाचा निर्णय
महाविद्यालयं येत्या ११ जानेवारीला सुरू
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयं येत्या ११ जानेवारीला सुरू होणार आहेत. पुण्यातील शाळा सुरू झाल्या मात्र कॉलेजेस अजूनही सुरू झाली नव्हती. कॉलेजमध्ये वर्ग कधी भरणार याबाबत असा प्रश्न उपस्थित झाला होता.
या संदर्भात निर्णय घेण्याआधी विद्यापीठाकडून एक समिती गठीत करण्यात आलीय. त्या समितीच्या अहवालानुसार ११ जानेवारीपासून कॉलेजेस सुरू करण्यास परवानगी देण्यात आलीय. कॉलेजेस सुरू असताना कोरोनाविषयक योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाने दिल्यात.
फिजिकल दिस्टांसिंग तसेच स्वच्छते विषयीचे नियम पाळून वर्ग भरवले जाणार आहेत. महत्वाचं म्हणजे पालकांची संमती घेऊनच मुलांना शाळांमध्ये पाठवलं जाणार आहे. त्यामुळे उद्या शाळांमध्ये कितपत उपस्थिती बघायला मिळते ते उद्याच कळणार आहे.
नाशिक जिल्ह्यात शाळांना सुरुवात होणार आहे. नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग उद्यापासून पुन्हा एकदा भरले जाणार आहेत. नाशिक शहरातल्या 206 शाळांमध्ये सुरू होतील. आता साऱ्यांचे लक्ष उद्या सुरू होणाऱ्या शाळांकडे लागून राहिले आहे.
मार्च महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लॉकडाउनचा निर्णय जाहीर करण्यात आला. मुंबईतील बंद झालेल्या शाळा नवीन वर्षातच उघडणार आहेत. राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्यात शाळा उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र, मुंबई महापालिकेने शाळा लगेचच उघडण्यास नकार दिला. तसेच पालकांचाही फारसा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दोन वेळा शाळा सुरू करण्यास मुदतवाढ दिली होती.