नाशिक  : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊसतोडणीच्या दरावर तोडगा काढल्यानंतर आता नाशिककडे आपला मोर्चा वळवलाय. उद्या पवारांचा नाशिक दौरा आहे. या दौऱ्यात ते कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांची भेट घेणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांदा साठवणीवर मर्यादा घातल्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केलीय. गेल्या दोन दिवसांपासून हा तिढा सुरू आहे. यावर आता पवार उद्या तोडगा काढतात का याबाबत उत्सुकता लागलीय 


शरद पवार  म्हणाले, मी उद्या नाशिकला जाणार आणि कांदा उत्पादकांना भेटून त्यांची भूमिका जाणून घेणार आहे.  केंद्र सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांच्या हिताची आहे, असं वाटत नाही. आयातीला  पाठिंबा आणि साठा करण्यासाठी मर्यादा हे धोरण आहे. तसेच यावेळी शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर बोलण्यास टाळलं आहे.