सागर आव्हाड, झी 24 तास, पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात (Pune) शिक्षकांचा बदली घोटाळा (Teachers Transfer Scam) समोर आलाय. सोईनुसार बदली मिळावी म्हणून शिक्षकांनी खोटी कारणं आणि त्यासाठी खोटे दाखलेही (Fake Document) सादर केल्याचं समोर आलंय. पाहुयात शिक्षकांच्या बदली घोटाळ्यावर झी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट. (after tet scam now teachers transfer scam see full report at pune)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे तिथे काय उणे, विद्येचं माहेरघर असं पुण्यासाठी अभिमानानं म्हटलं जातं, पण आता पुण्यात शिक्षकांचा चक्क बदली घोटाळा समोर आलाय. हव्या त्या शाळेत पोस्टिंग मिळावी किंवा सोईनुसार नियुक्ती मिळावी यासाठी शिक्षकांनी बोगस दाखले सादर केल्याचं समोर आलंय. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी शस्त्रक्रिया, अपघात, घटस्फोट असे बनावट दाखले सादर केलेत, इतर शिक्षकांच्या तक्रारीवरुन हा बदली घोटाळा समोर आलाय.



शिक्षकांचा 'बदली' घोटाळा?


जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू. बदलीतून सूट किंवा सोईची शाळा यासाठी शासनाचे निकष. दिव्यांग, पक्षघात, हृदय शस्त्रक्रिया, यकृत प्रत्यारोपण, कर्करोग, घटस्फोटित असे निकष. कोणत्याही एका प्रकारात येत असलेल्या शिक्षकांना इच्छेनुसार बदली किंवा बदलीतून सूट मिळते. याच निकषांचा फायदा घेण्यासाठी शिक्षकांकडून बोगस प्रमाणपत्रं सादर. शस्त्रक्रिया झाल्याची, घटस्फोटीत असल्याचे बनावट दाखले सादर. शिक्षकांकडूनच जिल्हा परिषद प्रशासनाकडे आक्षेप. 


सुजाण आणि प्रामाणिक नागरिक घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते, असं आपण लहानपणापासून ऐकत असतो. पण सोईच्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी किंवा बदलीच होऊ नये यासाठी काही शिक्षकांकडून बनावट दाखले देण्याचा जो प्रकार घडलाय त्यामुळे जनाची नाही पण मनाची तरी लाग बाळगा अशा प्रतिक्रिया उमटतायत. शिक्षकांकडूनच असे प्रकार घडणं शिक्षण क्षेत्रासाठी चिंताजनक आहे.