कोल्हापूर : शिवसेनेने कोल्हापुरात 'मोदी हटाव, किसान बचाव' मोर्चा सुरू केला. केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी कोल्हापुरात शिवसेनेने हा मोर्चा काढला. खानविलकर पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोदी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी मोदी हटाव देश बचाव, इडा पीडा टळो बळीराजाचे राज्य येवो असा नारा दिला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेनं कोल्हापुरात मोदी हटाव किसान बचाव मोर्चा काढला. यात शिवसेना पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांसाठी हा कृषी कायदा चांगला नाही. त्यामुळे तो रद्द  झाला पाहिजे, अशी काही शिवसेना कार्यकर्त्यांनी मागणी केली. मोदी हटाव, देश बचाव असा नारा देत भाजवविरोधात शिवसेनेने आंदोलन केले. 


केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे रद्द केले पाहिजेत. शेतकरी जगला तर आपण जगू. आज शेतकऱ्यावर संकट आहे. या संकटातून  बाहेर काढण्याऐवजी मोदी सरकार शेतकऱ्याला उद्धवस्त करत आहेत. त्यामुळे नव्याने करण्यात आलेले कायदे रद्द झालेच पाहिजे, अशी मागणी यावेळी शिवसेनेने केली. तसेच मोर्चाच्यावेळी मोदी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी मोदी हटाव देश बचाव, इडा पीडा टळो बळीराजाचे राज्य येवो असा नारा दिला.