मुंबई : कोविड काळ प्रत्येकाला शिकवून जातोय या परिस्थिती ऑक्सिजन किती महत्वाचा आहे? याची जाणीव प्रत्येकाला होत आहे. फुकट असलेला ऑक्सिजन आज कोणत्याही भावात खरेदी करण्यासाठी तयार आहेत. असं असताना प्राणवायू समजला जाणारा ऑक्सिजनचा तुटवडा जाणत आहे. ऑक्सिजन बेड न मिळाल्याने शेकडो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत, राज्यात अशी वैद्यकीय सुविधांअभावी आणीबाणी सुरू झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या परिस्थितीत देवदूत ठरलेले डॉक्टर आपल्या जीवाची बाजी लावून सुविधा देत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक डॉक्टर सल्ला देताना, मार्गदर्शन करताना दिसत आहेत. अशा वेळी अहमदनगर तालुक्यातील वाळकी गावातील डॉक्टर दाम्पत्याने प्रिस्क्रिप्शनद्वारे दिलेला संदेश सोशल मीडियातून तुफान व्हायरल होत आहे.



डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर सर्वसाधारणपणे औषधांचा तपशील असतो. कोणत्या गोळी कोणत्या वेळेत घ्यायची. जेवणानंतर काय घ्यायचं अशा आशयाचा मजकूर असतो. परंतु अहमदनगरच्या डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनने सर्वांचे खाडकन डोळे उघडले आहेत. प्रिस्क्रिप्शन लिहिणाऱ्या डॉ. युवराज आणि कोमल कासार यांचे वाळकी गावात संजीवनी नावाचे हॉस्पिटल आहे. गेल्या वर्षीपासून तेथे त्यांनी कोविड सेंटरही सुरू केलंय. आतापर्यंत त्यांच्या कोविड सेंटरमधून पाचशेहून अधिक रूग्ण बरे झाले आहेत. 


असं आहे प्रिस्क्रिप्शन


आजारातून बरा झाल्यानंतर एक झाड लावा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन कमी पडणार नाही, असा तो संदेश आहे. महाराष्ट्रातील सर्वच माध्यमातून हे प्रिस्क्रिप्शन व्हायरल होते आहे. प्रत्येक रूग्णासाठी प्रिस्क्रिप्शनवर हाताने संदेश लिहिण्यासाठी मोठा वेळ जात होता, त्यामुळे आता आम्ही स्टॅम्प बनवून घेतला आहे.