धक्कादायक! या जिल्ह्यात झपाट्यानं वाढतायत कोरोनाचे रुग्ण
कोल्हापूरनंतर सलग दुसऱ्या दिवशी आलेल्या या आकडेवारीनं वाढवली सर्वांची चिंता
मुंबई: राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण कमी होण्याचं नावच घेत नाही. जिल्ह्यात झपाट्यानं आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे अहमदनगरसह ग्रामीण भागांत भीतीचं वातावरण आहे.
अहमदनगरमध्ये दुसरी लाट ओसरते म्हणता म्हणता पुन्हा एकदा झपाट्याने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. 29 जुलै रोजी 920 नवीन रुग्ण जिल्ह्यामध्ये आढळले होते. तर ७८६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचार सुरू असलेले रूग्णांची संख्या 5553 वर पोहोचली आहे.
तर गेल्या 24 तासात 918 रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आल्य़ानं चिंता वाढली आहे. तर अहमदनगरमध्ये ७७४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या सध्या ५६८७ एवढी आहे. तर आतापर्यंत पोर्टलवर मृत्यू झालेल्या रुग्णांची नोंद ही 6165 एवढी करण्यात आली आहे. दुसरीकडे अहमदनगरमध्ये थाटामाटात लग्न करणं चांगलंच महागात पडलं. मिरी रोडवरील ममता मंगल कार्यालयात सुमारे 500 वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाह सोहळा सुरू होता.
लग्न सोहळ्याची माहिती तहसीलदार अर्चना पागिरे यांना मिळताच लग्नात जेवणावळी सुरू असतानाच प्रशासन तिथं पोहचलं आणि कारवाईचा बडगा उगारला. वधू-वराच्या आई-वडिलांसह कार्यालय मालकाला दंड ठोठावला आहे. त्यासोबतच कोरोना परिस्थिती संपेपर्यंत कार्यालय सील करण्यात आलं आहे.