मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात अर्थसंकल्प मांडतांना दारुवरील कर वाढण्याची घोषणा केली होती. कर वाढवल्यामुळे सरकारच्या तिजोरीत जवळपास 1 हजार कोटींचा महसूल जमा होणार आहे. उत्पादन शुल्क दरापेक्षा यंदाच्या बजेटमध्ये दर वाढवण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडतांना देशी तसेच ब्रॅण्डेड मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर २२० टक्के अथवा प्रत्येक प्रुफ लिटरच्या मागे १८७ रुपये या पैकी ज्याचे दर जास्त असतील ते लावण्याचा प्रस्तावित केले होते. तसेच, दारुवरील मूल्यवर्धित कर कायद्याच्या अनुसूची ‘ख’ नुसार ६० टक्के मूल्यवर्धित करामध्ये वाढ करून त्याला आता ६५ टक्के करण्यात आले आहे. मूल्यवर्धित कर कायद्याच्या कलम ४१ (५) नुसार मद्यावर ३५ टक्क्यावरून ४० टक्के करण्यात आले आहे. यामुळे विदेशी दारूच्या दरामध्ये ७ ते १० रुपयांनी वाढ होण्यार आहे.


राज्यात यामुळे आता दारुचे दर वाढणार आहेत. यामुळे मद्यप्रेमींना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.