Maharashtra Politics : 9 महिन्यात बाळ जन्माला येतं पण यांना...; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला
अजित पवार यांनी (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकार जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन (Cabinet expansion) त्यांनी टीका केली आहे.
Ajit Pawar on Shinde Fadnavis Government : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकार जोरदार हल्लाबोल केला आहे. नऊ महिन्यात बाळ जन्माला येतं. यांना साधा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) करता येत नाही असं म्हणत अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde Fadnavis Government ) निशाणा साधला आहे.
नऊ महिन्यात बाळ जन्माला येतं, मात्र यांना सात महिन्यात मंत्रीमंडळ विस्तार करता आला नाही, असा म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला जोरदार चिमटा काढला. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात एकाही महिला मंत्र्याचा समावेश नाही यावरुन देखील अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.
शिंदे फडवणीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही, राज्यातील महिला कर्तुत्वान नाहीत का ? असा सवाल देखील अजित पवारांनी उपस्थितीत केला. हिंगोलीतल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी राष्ट्रवादीचा खळबळजनक दावा?
दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु असताना राष्ट्रवादीने खळबळजनक दावा केला होता. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रणच दिलं नव्हतं. माहितीचा अधिकारातून (RTI) ही माहिती मिळाल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासेंनी केला होता. मात्र, राष्ट्रवादीचा हा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोडून काढला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कागदपत्र राज्यपालांकडे आहेत, राज्यपाल कार्यालयाकडे नाहीत असं आरटीआयमध्ये म्हटल्याचं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे.
मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर
ऑगस्ट 2022 मध्ये शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. यानंतर 12 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. खाते वाटप जाहीर करण्यासही शिंदे-फडणवीस सरकारने विलंब केला. यानंतर आता चर्चा रंगलेय ती दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची. यामुळे सगळ्यांचेच लक्ष या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. या मंत्री मंडलात महिलांना संधी दिली जाईल अशी देखील चर्चा आहे.