अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार अंमलात आणले तर स्मारकाचे सार्थक होईल, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी येथे मोदींना लगावला. दरम्यान, काँग्रेस पक्षाचे पहिले उपपंतप्रधान राहिलेल्या सरदार पटेलांचा पुतळा उभारण्याची गरज मोदींना वाटावी यातूनच काँग्रेसचे विचार किती महत्वाचे आहेत, याची प्रचिती यावी, असा सवाल उपस्थित केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील तब्बल 560 छोटी-मोठी संस्थान देशात विलीनीकरण करून देश एकसंध ठेवला, त्यांचे विचार हे काँग्रेसच्या सर्वधर्मसमभावनेचे होते की जे आजही महत्वाचे आहेत. सरदार पटेलांनी ज्या विचाराने राजकारण आणि समाजकारण केले त्यातील थोडा जरी विचार मोदींनी अंगीकारला तरच  त्यांचे स्मारक सार्थकी लागले, असे म्हणावे लागेल, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. 


आज कर्जत इथे ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुंड यांचा जीवनगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यासोहळ्यात गुंड यांना अजित पवार यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी 
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, जिल्हा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पवार यांनी हे वक्तव्य केले. पवार पुढे म्हणाले, गुजरातच्या साबरमती इथे सरदार पटेलांचा 182 मीटर्स उंच असा जगातील सर्वात उंच असा पूर्णाकृती सुमारे पुतळा तीन हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात आला आहे. 


काँग्रेस पक्षाचे पहिले उपपंतप्रधान राहिलेल्या सरदार पटेलांचा पुतळा उभारण्याची गरज नरेंद्र मोदींना वाटावी यातूनच काँग्रेसचे विचार किती महत्वाचे आहे याची प्रचिती यावी. सरदार पटेलांनी 560 संस्थाने आपल्या 40 दिवसांच्या गृहमंत्री पदाच्या दिवसांत देशात विलीन केली. त्यांचे देशाप्रती हेच कर्तृत्व सर्वात मोठे स्मारक असून यापेक्षा इतर कोणतेही स्मारक मोठे असू शकत नाही, असेही अजित पवार म्हणाले.