मुंबई : कोल्हापूर उत्तर (Kolhapur North Poll Bye Election) पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आहे. काँग्रेसच्या (Congress) उमेदवार जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांचा १८ हजार ९०१ मतांनी पराभव केला आहे.  पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या विजयानंतर महाविकासआघाडीने जल्लोष केला. यावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या निकालावर प्रतिक्रिया देताना भाजपवर टीका केली आहे. 


'कोल्हापूर पोटनिवडणुकीत स्वतः उद्धव ठाकरेंनी लक्ष घातलं होतं. काही झालं तरी यश आम्हाला मिळणार आशा प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. काही वेगळे विषय घेऊन जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला त्यातून मत मिळतात की काय असा ही प्रयत्न झाला. पण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात त्याला थारा मिळला नाही. अतिशय चांगल्या मताधिक्याने जाधव ताई निवडून आल्या. त्यांचे अभिनंदन. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी चांगले श्रम घेतले. एकोप्याने ठेवण्याचे काम केले.' असं अजित पवारांनी म्हटलं आहे.


कोल्हापूर उत्तर (Kolhapur North Poll Bye Election) पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांना ९६ हजार २२६ मते मिळाली तर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम  यांना ७७ हजार ४२६ मते मिळाली.