आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : राज्याचे माजी उपमु्ख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. राजकीय सभांसह सभागृहातही बोलताना अजित पवार आपल्या खास शैलीतून विरोधकांना फटकारत असतात. वेळोवेळी ते कार्यकर्त्यांतचेही कान टोचत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर दौऱ्यावर (chandrapur flood) असलेल्या अजित पवारांच्या या स्वभावाचा असाच अनुभव एका पदाधिकाऱ्याला आला आहे. अजित पवार हे सध्या अतिवृष्टीने ग्रस्त अशा चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेस खासदार बाळु धानोरकर यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती.


खासदार बाळु धानोरकर यांच्या निवासस्थानाहून गाडीत बसताना अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक दीपक जयस्वाल या ज्येष्ठ पदाधिकाऱ्या ला गाडीत बसायची खूण केली होती., मात्र अजित पवार यांनी आपल्याकडे लक्षच दिले नसल्याची जयस्वाल यांनी तक्रार केली. त्यावर अजित पवार संतापले आणि माझं सर्वांकडे लक्ष असतं असे म्हणत गाडीत बसले. 


मी गाडीत बसायला सांगितले होते ना असे अजित पवार म्हणाले. त्यावर दीपक जयस्वाल यांनी बसलो होतो ना, तुमचे लक्षच नाही असे रागाने म्हटले. यावर अजित पवारही भडकले. "तसं काही बोलायचं नाही. मी सगळ्यांसोबत बोलत आहे. मी तसला माणूस नाही," असे अजित पवारांनी सुनावले. मी इथे पक्षवाढीसाठी जीवाचे रान करतोय असेही अजित पवार म्हणाले.



दरम्यान, शहरात अजित पवारांच्या पूर दौऱ्याचे काँग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणात बॅनर लावले आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आधीच नाराज होते. त्यातच अजित पवारांनी शहराच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला फटकारल्याने नाराजी आणखी वाढण्याची शक्यता आहे.