Maharashtra Government Formation Live Updates :  राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. संपू्र्ण राज्याचं लक्ष याकडे लागलं आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे. कारण विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस झाले आहेत. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या आहेत. तरीही सरकार स्थापन होत नसल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता दिसून येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तास्थापनेत विलंब होत असल्यामुळे तातडीनं सरकार स्थापनेची मागणी केली आहे. त्यासोबतच अजित पवार गटातील नेत्यांनी देखील लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याची मागणी केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, लवकरच भाजपचा मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी करा. आज अजित पवार दिल्लीत अमित शाहांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. निकालानंतर 10 दिवस उलटले तरी सरकार स्थापन होत नसल्यामुळे अजित पवार अस्वस्थ असल्याचं म्हटलं जातं आहे. 


शिंदे महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार 


विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस उलटले आहेत. तरी देखील महायुतीचा शपथविधी झालेला नाहीये. शपथविधीला विलंब होत असल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार आणि पक्षातील नेते ही अस्वस्थ आहेत. एकनाथ शिंदे आज दुपारी सह्याद्रीवर बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर संध्याकाळी महायुतीमधील वरिष्ठ नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे. 


शपथविधीची जोरदार तयारी सुरु 


विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुती सरकारचा मुख्यमंत्री होणार आहे. परंतु निकालानंतर 10 दिवस झाले तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये. 5 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. दरम्यान, शपथविधीपूर्वी एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघड्यामुळे सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या चर्चांना देखील उशीर होत आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून मी माघार घेत असल्याचं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.