शिवसेनेचे नाराज भास्कर जाधवांची अजित पवार, जयंत पाटील यांनी घेतली भेट
शिवसेनेत नाराज असलेल्या आमदार भास्कर जाधव यांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांनी घेतली.
रत्नागिरी : शिवसेनेत नाराज असलेल्या आमदार भास्कर जाधव यांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांनी घेतली. अजित पवार हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी जाधव यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. जाधव पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेत नाराज असलेल्या भास्कर जाधवांची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची रत्नागिरीत भेट घेतली. अजितदादा आणि जयंत पाटील रत्नागिरीत आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या लग्नासाठी आले होते. या वेळी अजितदादा आणि जयंत पाटलांनी भास्कर जाधवांची भेट घेतली. या भेटीनं भास्कर जाधवांचा चेहरा खुलला होता.
जाधव यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घरीही नेले. यावेळी भास्कर जाधव स्वतः ड्रायव्हर सीटवर बसले होते. शिवसेनेत नाराज असलेल्या भास्कर जाधव राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आगतस्वागत मनापासून करत होते. त्यामुळे भास्कर जाधव पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार की? ही फक्त सदिच्छा भेट होती याची चर्चा रत्नागिरीत सुरू झाली आहे.