परखड स्पष्टवक्ते अजितदादा मुलीसमोर हात जोडतात तेव्हा...
Ajit Pawar joined hands in front of the girl at Pune Program : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहेमीच आपल्या स्वभावाने चर्चेत असतात. आता त्यांनी हात का जोडले, याचीच चर्चा होत आहे.
पुणे : Ajit Pawar joined hands in front of the girl at Pune Program : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहेमीच आपल्या स्वभावाने चर्चेत असतात.कधी सभेत थेट कार्यकर्त्याचे कान टोचणे तर कधी कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या खातीर थेट चहाच्याच टपरीवर चहा पिणे. असे अनेक दादांच्या किस्से सर्वांनी ऐकले आहेत आणि बघितलेदेखील आहे. तर नेहमी दादाची दादागिरी देखील सर्वांनी पाहिली आहे. पण आज अजितदादांनी एका विद्यार्थिनीसमोर हातच जोडले.
पुण्यात देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकेचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदर्शनाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका विद्यार्थिनीला तिच्या मार्काबद्दल प्रश्न विचारला आणि त्या विद्यार्थिनीचे मार्क एकूण दादांनी थेट हातच जोडले. तुम्हाला मेरीटवर अॅडमिशन मिळालं?, मार्क किती?, 99.10 मार्क. हे ऐकणू अजित पवारांना विद्यार्थ्यांचे मार्क ऐकून धक्का बसला आणि त्यांनी चक्क हात जोडलेत.
दरम्यान, कालही बिनधास्त दादांनी जर सबुरीने घेतलं. एका कार्यक्रमात म्यानातून बाहेर निघणाऱ्या तलवारीची राज्यातील मंत्र्यानी धास्ती घेतल्याचंच चित्रं आहे. भाजपचे माजी आमदार सरदार तारा सिंग यांचे नातू गुरज्योत किर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गुरज्योत किर यांनी आदराने अजित पवारांना तलवार भेट देऊ केली आणि प्रथेप्रमाणे गुरूज्योत यांनी भेट म्हणून देण्यासाठी तलवार म्यानातून काढण्यासाठी हात पुढे केला आणि लगोलग अजित पवारांनी पुढे होऊन त्यांचा हात धरला आणि दुसरा हात कपाळावर मारुन घेतला.
एवढंच नाही तर भेट स्विकारताना त्यांनी मास्क खाली काढून गुरूज्योत यांच्या कानात हळू आवाजत सांगितले. तलवार मान्यातून काढून कशाला नसती आफत अंगावर घ्या.. असेच काहीसे त्यांचे हावभाव होते.