Ajit Pawar on Mission Chandrayaan 3 : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये  (Shinde-Fadanvis Government) उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) आज पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड महापालिकेत आले होते, यावेळी त्यांचं जंगी स्वागत झालं. महापालिकेत अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत तीन तास बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चांद्रयान मोहिमेच्या यशाबादल शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. चांद्रयान तीनच्या लँडिंगच्या दिवशी प्रतिक्रिया देताना चांद्रयान (Chandrayaan3) ऐवजी चंद्रकांत असा उल्लेख केला होता. अजित पवार यांचं हे विधान सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल झालं होतं. याबद्दल आज अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली.


उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना चूक व्हायला नको होती, पण कामाच्या व्यापात चूक झाली, याचा बाऊ केला गेला. पण मी माफी मागणारा कार्यकर्ता आहे. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच  जे काम शास्त्रज्ञांनी, तंत्रज्ञांनी केलं, ते कौतुकास्पद आहे. नागरिकांनी या मोहिमेला त्याला मनापासून पाठिंबा दिला होता. देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल, असा हा प्रसंग आहे' असं पवार म्हणाले.