Maharastra Politics: अजित पवार (Ajit Pawar) यांचा काही नेम नाही, असं वाटायला लागलं ते २०१९ पासून... नोव्हेंबर महिन्यातल्या त्या एका पहाटेनं अजित पवारांबद्दलचे बरेचसे अंदाज चुकीचे ठरवले. अजित पवार आताही त्यांची राजकीय दिशा (Maharastra Politics) बदलणार का?, याची कुणकुण आम्हाला आधीच लागली होती, म्हणूनच आम्ही अजित पवारांना भाजपसोबत जाणार का, असं थेट विचारलं होतं, त्यावर अजित पवार काय म्हणतात? पाहा...


आता दिवसाढवळ्या शपथपिधी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राला झोपेतून खडबडून जागं करणारी ती सकाळ... २३ नोव्हेंबर २०१९... देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री.... डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, अशी ती दृश्यं होती... आता पुन्हा नव्यानं तोच दिवस उगवणार की काय, अशी चर्चा सुरू झालीय. दोन परस्परविरोधी विचारधारांचे प्रतिनिधीत्व करणारे हे दोन नेते सत्ता स्थापनेसाठी एकत्र आल्याने महाराष्ट्रात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पुढचे दोन दिवस अजित पवारांची मनधरणी, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या शरद पवारांकडून (Sharad Pawar) अजित पवार अशा चकरा हा सिलसिला सुरू राहिला. अखेर अजित पवार सिल्व्हर ओकवर माघारी परतले आणि फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवारांचं हे पहाटेचं सरकार अवघ्या ७८ तासांमध्ये कोसळलं.


आणखी वाचा - Sharad pawar: 'सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही', शरद पवार यांचा आगडोंब!


अजित पवार भाजपसोबत जाणार?


ऐतिहासिक शपथविधीच्या पहाटेच्या आठवणी मधून मधून जाग्या होत असतात आणि त्यामुळेच भाजप आणि अजित पवारांचं अजूनही अधूनमधून एकमेकांना डोळे मारणं सुरू आहे की काय, अशा शंकाही घेतल्या जातात. अजित पवार भाजपचा हात धरणार अशी कुणकुण आम्हाला आधीच लागली होती, म्हणूनच झी २४ तासच्या ब्लॅक अँड व्हाईटमध्ये अजित पवारांना याबद्दल विचारलं होतं. भाजपबरोबर (BJP) जाणार का? असा सवाल अजित पवार यांना विचारण्यात आला होता.


राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नाही, आणि कुणी मित्र नाही, असं स्वतः अजित पवारच म्हणाले आणि ब्लॅक अँड व्हाईटच्या (Black and white) मुलाखतीतलं त्यांचं हे वक्तव्य म्हणजेच भाजपसोबत जाण्याच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे की काय अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली. त्यामुळे आता पहाटे नव्हे तर दिवसाढवळ्या दिमाखात शपथविधी महाराष्ट्राला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 



दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनामधील रोखठोकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव असल्याचं म्हटलं होतं. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये शरद पवारांनी आपबिती मांडली होती. तर अजित पवार आणि अमित शहा यांच्यात दिल्लीत बैठक झाल्याची बातमी देखील समोर आली होती. त्यामुळे आता अजित पवार यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होणार, अशी शक्यता आहे.