Arunachal Pradesh Assembly Election Result :  अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं अरुणाचल प्रदेश विधानसभेत  एन्ट्री केली आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. टोको तातूंग, लिखा सोनी आणि निख कमिन या तीन जणांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. तर, 2 उमेदवार थोड्याच फरकानं पराभूत झालेत. एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पिछेहाट दिसत आहे. मात्र, अरुणाचल प्रदेशात मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा डंका वाजताना दिसत आहे. अरुणाचल प्रदेशातील 50 विधानसभेच्या जागांसाठी मतदान झाले. 


अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल समोर आला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या 60 जागांपैकी, 46 जागा भाजपनं जिंकत निर्विवाद बहुमत मिळवलंय. विशेष म्हणजे अजित पवार पक्षानं या निवडणुकीत 3 जागा जिंकल्या आहेत. तर सिक्कीममधील विधानसभेच्या 32 जागांसाठी मतदान झालं. त्यापैकी 21 जागा सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा म्हणजेच SKMनं जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे.