`2024 ला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री`, जयंत पाटलांच्या विधानावर अजितदादांचा सुपला शॉट, म्हणतात...
Maharastra Politics: महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) असेल, असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं होतं. राष्ट्रवादीच्या वादाला मुख्यमंत्रीपदाची किनार आहे का? असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत. अशातच जयंत पाटलांच्या विधानावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिलं आहे.
Ajit Pawar On Jayant Patil: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या एक दिवसाच्या कथित नाराजी नाट्यानंतर राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) राष्ट्रवादीबद्दल उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले असून येत्या काळात राज्याच्या राजकारणात उलटफेर होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येतीये. होय, मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं म्हणताच अजितदादा पहाटेच्या वाटेवर आहेत का? असा सवाल आता विचारला जातोय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या विधानावर बोलताना अजित पवार यांनी पुन्हा फुल टॉसवर सिक्सर खेचल्याचं दिसून येतंय.
महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) असेल, असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं. 2024 ला राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार, असंही पाटील म्हणाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार, पण नक्की कोण? राष्ट्रवादीच्या वादाला मुख्यमंत्रीपदाची किनार आहे का? असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत. अशातच जयंत पाटलांच्या विधानावर अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले Ajit Pawar?
अजित पवार यांना जयंत पाटील (Ajit Pawar On Jayant Patil) यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावेळी जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो, त्यांचं म्हणणं खरं ठरो, असं अजितदादांनी म्हटलं. सरकारला दहा महिने पूर्ण झालेत, पण जनतेच्या मनात या सरकारबद्दल समाधान असल्याचं दिसत नाही, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
मविआची वज्रमूठ सभा
मुंबईतली मविआची वज्रमूठ सभा (Vajramuth Sabha) ऐतिहासिक होईल असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. या सभेला अजित पवार आणि नाना पटोलेही उपस्थित राहतील, मात्र उद्धव ठाकरेच सभेचं प्रमुख आकर्षण असतील असंही राऊत म्हणाले.
आणखी वाचा - Maharashtra Day: 'चला शपथ घेऊया...', महाराष्ट्र दिनानिमित्त अजित पवार यांची खास पोस्ट!
महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेसाठी, मुंबईतल्या बीकेसीमध्ये वाहतुकीत बदल करण्यात आलेत. दुपारी 1 ते रात्री 12 वाजेपर्यंत पश्चिम उपनगरातून कुर्ल्याच्या दिशेने प्रवेश बंदी असेल. कौटुंबिक न्यायालयापर्यंतच प्रवेश असणार आहे. तर पूर्व उपनगरातून चुनाभट्टी ते बिकेसी कनेक्टर उड्डाणपुलावरून वाहनांना प्रवेशबंदी असेल.