पुणे : Ajit Pawar's powerful speech at Pune : येथील तळजाई वन उद्यानाच्या प्रवेशद्वाराच उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी वन खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. दरम्यान, तळजाई टेकडीवरील घाणीवरून अजित पवार यांनी पुणेकरांना जोरदार टोला लगावला. तळजाई टेकडीवर येताना कुत्रे घेऊन येऊ नका, त्यांचे घरीच लाड करा, असे म्हटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 तळजाई टेकडीवरील वन उद्यानातील विकासकामांचं आज सकाळी अजित पवारांनी उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी टेकडीवर असलेल्या घाणीवरून पुणेकरांना टोला लगावला. त्यांनी सकाळी सकाळी  जोरदार फटकेबाजी केली. कुत्र्यांना घरी जवळ घेऊन झोपा, पण टेकडीवर आणि नका, असे बजावले.  


कार्यक्रमाची वेळ सकाळी सातची असताना अजित पवार पावणे सात वाजताच दाखल झाले. यावेळी त्यांनी उद्यानाची पाहणी केली तसेच तळजाई वर फिरायला येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या भाषणात अजित पवार यांची फटकेबाजी ऐकायला मिळाली.


पुण्यात मोठ्या प्रमाणावर काँक्रीटचे जंगल होत आहे. पुण्यात हिरवाई राहिली पाहिजे. पण काही लोक राजकीय स्वार्थासाठी झोपडपट्ट्या वाढवाताहेत असा आरोप करत म्हणाले गरिबांना घरे मिळाली पाहिजे. लोक कुठेही कचरा टाकतात. निसर्गाची काळजी आपण घेतली पाहिजे. तळजाई वर भटकी कुत्री यायला नको. लोक पाळीव कुत्री पण घेऊन येतात. त्यामुळे ससे, मोर, पक्षी कमी झालेत. काही वेडी लोक डुकरं आणून सोडतात. वन क्षेत्रात असे प्राणी आणण्यास मनाई करण्यात आलीय. त्याचे पालन आवश्यक आहे.


'पुण्यात लोक खूपच हुशार आहेत'



तळजाई वर देशी आणि स्थानिक झाडांची लागवड केली गेली पाहिजे. कोरोनाच्या काळात आपल्याला ऑक्सिजनचे महत्व पटलं. रुग्णाचे जीव वाचवण्यासाठी उद्योगांचा ऑक्सिजन आपल्याला थांबवावा लागला. त्यामुळे आपल्याला वर्षानुवर्षे ऑक्सजन पुरवणारी वृक्ष आपण जपली पाहिजे. तळजाईवर प्रतिदिन 1 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय झाला. त्याला विरोध झाला. आपण 100 रुपयांचे पेट्रोल घालून इथपर्यंत येतो. पण 1 रुपया देणार नाही. पुण्यात लोक खूपच हुशार आहेत. लोक लगेच कोर्टात जातात. मला पिंपरी चिंचवड मध्ये ही अडचण जाणवली नाही. कुठल्याही गोष्टीला विरोध करण्यापूर्वी थेट कोर्टात जाण्याआधी चर्चा करायला हवी. चर्चेतून प्रश्न सुटू शकतात. आपण पक्षीय भेद बाजूला ठेवून चर्चा करायला पाहिजे, असे पवार म्हणाले.