अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?
Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणूकीवर लक्ष केंद्रीत केले आहेत. विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. तशा प्रकारची सूचक वक्तव्ये स्वत: अजित पवार करत आहेत. अजित पवार निर्णय जाहीर करुन त्या निर्णयावर ठाम राहिल्यास बारामतीच्या राजकारणाला कलाटणी मिळेल. बारामतीच्या राजकारणात पहिल्यांदाच हा बदल पहायला मिळेल.
बारामतीला मी सोडून आमदार मिळाला पाहिजे - अजित पवार
लोकसभेचा पराभव उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जिव्हारी लागल्याचं पहायला मिळतंय. बारामतीमध्ये आज अजित पवारांनी पराभवाबाबत खंत व्यक्त केली. यावेळी त्यांनी बारामतीला मी सोडून आमदार मिळाला पाहिजे म्हणजे कामांची तुलना करता येईल असं ते म्हणाले...तर, सुनिल तटकरेही परवा म्हणाले हे काय झालं...असा दाखलाही अजित पवारांनी यावेळी दिला...त्याचबरोबर एवढा विकास करूनही बारामती हरल्याची खंत अजित पवारांनी यावेळी व्यक्त केली...तर उपस्थित कार्यकर्त्यांनी अजित पवारांनाच निवडणूक लढवण्याची विनंती करत गोंधळ घातला...
छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण
विधानसभेत अजित पवार निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिलीय. अजित पवार आमचे कॅप्टन आहेत. ते मध्येच शस्त्र टाकणार नाहीत.. त्यांनी केवळ गेल्या निवडणुकीची व्यथा मांडली, असं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलंय. तर अजित पवार बारामतीतून निवडणूक हारणार आहेत आणि हे त्यांनाही माहीत आहे, असा हल्लाबोल संजय राऊतांनी अजित पवारांवर केलाय.
शरद पवारांपुढे टिकाव लागणार नाही - विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. शरद पवारांपुढे टिकाव लागणार नाही, असं अजित पवारांना दिसतं. त्यामुळे त्यांनी चूक मान्य केल्याची टीका वडेट्टीवारांनी केलीय. दरम्यान, घरामध्ये फूट पाडणं समाजाला अवडत नाही. याबाबत अनुभवही घेतलाय आणि चूकही मान्य केली, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. यावर वडेट्टीवारांनी टीका केलीय. अजित पवार नैराश्यातून असे विधान करत असल्याची टीका वडेट्टीवारांनी केलाय.
अजित पवार यांना बरोबर घेतल्यानं भाजपची विश्वासहार्यता कमी झाली आहे. महाराष्ट्रातच नाही तर, देशात कमी झाली आहे. त्यामुळे ते त्यांना म्हणु शकतील आता तुम्ही थोडसं दुर ऊभं राहा. निवडणुकीनंतर परत आपण जवळ येऊ. आता तुम्ही वेगळी निवडणुक लढवा, निवडणुक झाल्यानंतर आपण परत बोरोबर येऊ.