Ajit Pawar Vs Sharad Pawar Supporters: अजित पवार यांचा मोठा गट शिंद फडणवीस सरकार मध्ये सामील झाला आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. महाराष्ट्रात काका पुतण्या मध्ये सत्ता संघर्षाचा वाद निर्माम झाला आहे. आता हाच वाद विकोपाला गेल्याचे दिसत आहे. नाशिकमध्ये शरद पवार आणि अजित पवार गट आमने सामने आले आहेत. या दोन्ही गटांमध्ये भर रस्त्यात तुफान राडा झाला आहे. यामुळे संपूर्ण नाशिक शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे तैनात झाला आहे. पोलिस दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. 


नाशिकमध्ये नेमकं काय झालयं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट आणि आमने सामने आले आहेत.  शरद पवार आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा प्रकारच्या शरद पवार गटाकडून दिल्या जात आहेत. तर,  एकच वादा अजितदादा अशा प्रकारच्या घोषणा  अजित पवार गटाचे कार्यकर्ते देत आहेत. पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरुन या दोन्ही गटांमध्ये राडा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला छावणीच स्वरुप आलंय. कार्यालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. RCP म्हणजेच दंगा नियंत्रण पथकही तैनात करण्यात आलाय. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफुटीचा वाद आता कार्यकर्त्यांच्या पातळीवर उतरला


राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफुटीचा वाद आता कार्यकर्त्यांच्या पातळीवर उतरलाय. नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवनावरून दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने सामने आले. भुजबळ समर्थकांनी सकाळपासून राष्ट्रवादी भवनात ठाण मांडून हे भवन ताब्यात घेत शरद पवार समर्थकांची कोंडी केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाची आज भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र त्याआधीच भुजबळ समर्थक दिलीप खैरे, समाधान खैरे आणि इतरांनी या कार्यालयात ठाण मांडलंय. नाशिकमध्ये भुजबळ म्हणजेच राष्ट्रवादी असं समीकऱण दृढ झालं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी भवनही त्यांच्याच नेतृत्वात बांधलं गेलं होतं. मात्र आता या भवनावरून दोन्ही गटात तणाव निर्माण झाला आहे. 


मुंबईतही राष्ट्रवादी कार्यालयाच्या उदघाटनाआधीच राडा


मुंबईतल्या राष्ट्रवादी कार्यालयाच्या उदघाटनाआधीच राडा झाला होता.  अंबादास दानवेंच्या पीएने चावी न दिल्याने कार्यकर्ते कुलूप तोडून ऑफिसमध्ये घुसले होते. दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या नव्या कार्यालयाचं उदघाटन करण्यात आलं. मंत्रालयाच्या समोरच हे नवं कार्यालय आहे. अजित पवार, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, आमदार अमोल मिटकरी यावेळी उपस्थित होते.