पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कधी भडकतील हे सांगता येत नाही. अजित पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवार यांचा राग तसा नवीन नाही. हा 'दादा राग'' त्यांच्यासाठी कायमचा आणि जवळचा झाला आहे. अजित पवार यांच्या रागाबद्दल असंही म्हणतात की, अजित दादा ज्यांना अधिक जवळचे मानतात किंवा जे दादांच्या अधिक जवळ आहेत, त्यांच्यावरच दादा जास्तच जास्त वेळेस रागावतात.


अजित पवारांचा ''दादा राग''


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात असाच एक अजितदादांच्या रागाशी संबंधित एक किस्सा घडला. यावेळेस अजित दादा पुन्हा भडकले, ते कोणत्या कार्यकर्त्यावर नाही, तर राष्ट्रवादीचे प्रवक्त अंकुश काकडे यांच्यावर.
राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यालाच भर गर्दीत सुनावल्याने सर्व कार्यकर्ते अवाक झाले. गुंठेवारीचा विषय मंजूर केल्यानं काही गावकऱ्यांना घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकश काकडे आले होते. अजितदादांना त्यांचा सत्कार करायचा होता.


यावर अंकुश काकडे यांनी दादांची वाट वळवण्याचा प्रयत्न केला, अंकुश काकडे अजितदादांना फक्त ५ मिनिटं सत्काराला द्या, तेवढ्यासाठी ते थांबलेत, असं म्हणत होते.



... यामुळेच तुम्ही मागे राहतात


पण अजितदादांचा तो सत्कार आणि कार्यक्रम आटोपण्याच्या सपाट्याला अडथळा आल्यासारखं अजितदादांना वाटलं आणि अजितदादा संतापले, काम करू की सत्कार स्वीकारू, केलं ना तुमचं काम, आता सत्कार कशाला, यामुळेच तुम्ही मागे राहतात, असा दमच अजितदादांनी भरला. 



पुण्यात कौन्सिल हॉल येथे बैठकीसाठी अजित पवार आले होते, तेव्हा हा किस्सा घडला. अजित पवार सत्तेत आल्यावर त्यांच्या रागाचा पाराही तेवढाच वाढतो की काय अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.