बारामती: एका रॅलीमध्ये शरद पवार आणि राजू शेट्टी एकत्र पाहायला मिळाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रजासत्ताक दिनानिमित्त विरोधकांनी सरकारविरोधात संविधान बचाव रॅली काढली होती. या रॅलीच्या निमित्ताने कट्टर विरोधक असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी एकत्र आले. यानिमित्ताने या दोन्ही दिग्गज नेत्यांमधील राजकीय वाद मिटला असून संभाव्य आघाडी होणार का अशा चर्चा सुरु झाल्यात.


याबाबत विचारलं असता अजित पवारांनी यावर थेट बोलणं टाळलं असलं तरी सूचक विधान केलंय. राजकीय जीवनात बदल होत असतात असं सूचक आणि महत्त्वाचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. त्यामुळे आता जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.