Ajit Pawar stuck in lift: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांच्या अपघाताची मालिका सुरू असल्याचं पहायला मिळतंय. गेल्या महिन्याभरात चार आमदारांच्या कारला अपघात झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. हे अपघात आहेत की घातपात?, असे प्रश्न उपस्थित होत असतानाच आता राज्याच्या राजकीय वर्तुळातून (Maharastra Politcs) धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे दुर्घटनेमधून थोडक्यात बचावले आहे. (Ajit Pawar stuck in lift Elevator accident says tribute program should have been held marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar ) यांनी बारामतीमधील (Baramati News) सभेत काल घडलेल्या लिफ्ट दुर्घटनेचा (Elevator accident) किस्सा सांगितला. चौथ्या मजल्यावर आमची लिफ्ट अडकली आणि क्षणात सुरू होऊन जोरात आदळली. नाहीतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला असता. चॅनल्सवर ब्रेकिंग न्यूज (Breaking News) सुरू झाली असती असं म्हणत अजित पवारांनी आपबिती सांगितली.


आणखी वाचा - Bacchu Kadu Accident: बच्चू कडू यांचा घातपात की अपघात? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप!


दरम्यान, काही दिवसांत महाराष्ट्रातील चार आमदारांच्या कारला अपघात झाला आहे. भाजप आमदार जयकुमार गोरे (BJP MLA Jayakumar Gore), राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (NCP MLA Dhananjay Munde) आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम (Shinde Group MLA Yogesh Kadam) यांच्या कारला अपघात झाला. (Car Accident) या अपघतात तिन्ही आमदार जखमी झाले आहे.