Ajit Pawar : अजित पवारांनी डोळा मारला तेव्हाच अजित पवारांचा काही नेम नाही आणि ते कधी कुणाचा गेम करतील, हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती होती. गेल्या 7 एप्रिल 2023 रोजी अजित पवार काही आमदारांसह नॉट रिचेबल झाले होते. तेव्हापासूनच अजित पवार भाजपबरोबर जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याआधीही महाराष्ट्रानं अजित पवारांचं बंड, अचानक दिलेला राजीनामा, पहाटेचा शपथविधी असं बरंच काही अनुभवलं होतं. 


कधी क्लीन चिट, कधी नवे छापे हा ईडीचा अजित पवारांबरोबर पाठशिवणीचा खेळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचं भूत अजित पवारांची पाठ सोडायला तयार नव्हतं. किरीट सोमय्या फायलींचे गठ्ठेच्या गठ्ठे घेऊन फिरत होते. कधी नवं आरोपपत्र, कधी क्लीन चिट, कधी नवे छापे हा ईडीचा अजित पवारांबरोबर पाठशिवणीचा खेळ सुरू होता. म्हणूनच अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या वावड्या सतत उठायच्या. मात्र अजित पवार म्हणायचे ती मळमळ होती.


अजित पवारांना खरचं पित्ताचा त्रास झाला होता का? 


अजित पवारांचं ते जागरण नव्हे, पित्त नव्हे, मळमळ नव्हे तर ते नॉट रिचेबल म्हणजे काय होतं, हे उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनं दाखवून दिलं.  7 एप्रिल 2023 रोजी अजित पवार काही आमदारांसह नॉट रिचेबल झाले होते. 8 एप्रिल रोजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले होते. पित्ताचा त्रास झाल्यानं कार्यक्रम रद्द केल्याचे अजित पवारांनी सांगितले होते. नॉट रिचेबल झाले तेव्हा खरचं अजित पवारांना खरचं पित्ताचा त्रास झाला होता का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर या शपथविधीनंतर मिळत आहेत. 


पहाटेच्या शपथविधीनंतर दुपारचा शपथविधी 


पहाटेचा शपथविधी नेमका काय होता, यावरुन पडदा उठत नाही तोच दुपारचा शपथविधी पार पडलाय. आता ही अजित पवार यांची गुगली आहे की सिक्सर आहे की कुणी कुणाचा केलेला क्लीन बोल्ड आहे, हे थोड्या दिवसातच कळेल. या सगळ्या सत्तासामन्याचा कर्ता करविता कोच नेमका कोण, याचाही उलगडा लवकरच होईल.