RSS On NCP Ajit Pawar Group :  भाजप हा पक्ष लोकनेत्यांना संपवतो अशा शब्दांत, आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली. यूज अँड थ्रो ही भाजपाची प्रवृत्ती असल्याचं रोहित पवार म्हणाले. अजित पवार संदर्भात रोहित यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.  भाजप कडून अजितदादांच्या युज अँड थ्रो होत असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीत जास्त यश न मिळाल्याने केंद्रातील मंत्रीपदाबाबत अजित पवार गटांमध्ये अस्वस्थता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मुखपत्रातून अजितदादांमुळे भाजपच्या प्रतिमेबाबत केलेले लिखाण.  तसेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेा उमेदवारी दाखल केला तेव्हा कुठलाही भाजपचा नेता उपस्थित नव्हता.  निकालानंतर काही दिवसातच शिखर बँकेच्या प्रकरणाबाबत क्लोजर रिपोर्ट ला दिलेला आव्हान यावरून भाजप कडून अजितदादांचं राज्यातील महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे.  नेत्यांना समजेल का? असा प्रश्न असल्याच देखील रोहित पवार यांनी म्हटल आहे.


अजित पवारांशी केलेली हातमिळवणी आणि काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे भाजपच्या ‘ब्रँड’ला धक्का


सरसंघचालक मोहन भागवतानंतर संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरमधूनही भाजपची खरडपट्टी काढण्यात आलीय.  लोकसभा निवडणुकीत '400 पार'चा नारा देणारा भाजप 240 जागांवरच अडखळला. याचं कारण म्हणजे नरेंद्र मोदींचीच हवा असल्याच्या अतिआत्मविश्वासात असलेले भाजपचे नेते आणि कार्यकर्ते ‘ग्राउंड रिऍलिटी’पासून अनभिज्ञ राहिले. महाराष्ट्रात अजित पवारांशी केलेली हातमिळवणी आणि काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे भाजपच्या ‘ब्रँड’ला धक्का बसला. त्यामुळे पदरी अपयश आले, अशा शब्दांत ऑर्गनायझरमधून खडे बोल सुनावण्यात आलेत. संघाचे स्वयंसेवक असलेल्या रतन शारदा यांनी हा लेख लिहिलाय. यासोबतच भगव्या दहशतवादाचे आरोप करणा-या, 26/11 ला संघाचे कटकारस्थान म्हणणा-या आणि संघाला दहशतवादी संघटना असं संबोधणा-या काँग्रेस नेत्याला भाजपत प्रवेश देण्यात आला. यामुळे संघ स्वयंसेवकांची मनं दुखावली याकडेही लेखात लक्ष वेधण्यात आलंय.


अजित पवार गटाचा पलटवार


भाजपचा विजय झाला तर संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि पराजय झाला तर अजितदादामुळं.. महाराष्ट्राच्या जनतेचा कौल, रोष कोणावर आहे हे समजून घ्या... लिहता आणि बोलता आम्हाला पण येते. लेख लिहून महायुतीत मिठाचा खडा टाकू नका... अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांनी आपली नाराजी व्यक्त केली.