मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाऊबीजनिमित्त एक लाख महिलांना साडी वाटप केल्याने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टीका केली. त्यांनी चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता म्हटले, काहींना साड्या वाटाव्या लागगतात, मला साधा रुमारलही वाटवा लागला नाही. दरम्यान, पुण्यातील कोथरुड येथून कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढविली. ते विजयीही झाले. मात्र, काल त्यांनी भाऊबीजनिमित्ताने साडीवाटप केले. पाटील यांनी आपण एक लाख बहिणींना साडी वाटप करणार असल्याचे म्हटले होते. त्यावरुन त्यांच्यावर टीका होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांनी बारामतीतून १ लाख ८६ हजार मतांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपच्या गोपीचंद पडळकर यांच्यासह उर्वरित सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव केला. पडळकरांसह सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट देखील जप्त झाले. राज्यातील हा त्यांचा सर्वात मोठा विजय आहे. दरम्यान, अजित पवार यांनी शिवसेना - भाजप युतीच्या सत्ता स्थापन करण्यास उशीर होत असल्याचे  भाष्य केले. युतीत मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु आहे. त्यावर ते म्हणालेत, भाजपचे उमेदवार राजकारणात कोणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. निवडणुकीचे युद्ध संपले आहे. आता तहाची बोलणी सुरू आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून सर्व पाहत असल्याचा टोला त्यांनी भाजप-शिवसेनेला लगावला.


विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महायुतीला जनतेने कौल देताना धोक्याचा इशाराही दिला आहे. युतीला स्पष्ट बहुमत असताना राज्यात सत्ता स्थापेसाठी भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून राजकारण तापले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी एक सूचक विधान केल्याने राज्यात राजकारण बदलू शकते, अशी चर्चा आहे. भविष्यात राज्यात सत्तेचे नवे समीरकरण पाहायला मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे.


राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे अजित पवार म्हणालेत. तसेच, राष्ट्रवादी विरोधी पक्षातच बसणार असल्याचे सांगत, भाजप – सेनेच काय ठरले आहे, हे त्यांनाच माहीत. आम्ही सरकारच्या चुका दाखवण्याचे काम करू, असेही ते म्हणाले.