ठाणे :  ठाण्यात मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आलाय. एक एके-५६, ३ मॅगझिन्स, ९५ काडतुसं, नऊ एमएम पिस्तुल आणि १३ काडतुसं जप्त करण्यात आलीत. ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केलीय. या कारवाईत पोलिसांनी मुंबईतल्या नागपाडा इथं राहणाऱ्या जाहिद काश्मिरीला अटक केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाहिद काश्मीरीसह पोलिसांनी त्याच्या साथीदारालाही अटक केलीय.  १९९३ मधली दंगल आणि मुंबई स्फोटात वापरण्यात आलेल्या एके-५६ रायफलींपैकी ही एक रायफल असावी, असा पोलिसांना संशय आहे. कोकीन रॅकेटमध्ये जाहीद काश्मिरीला ठाणे पोलीस शोधत होते, तेव्हा जाहीदने ही रायफल नईम खान याच्या मुंबईतल्या गोरेगाव इथल्या घरी त्याच्या बायकोला दिली होती. पोलिसांनी गोरेगाव मधून ही रायफल जप्त केली.