सोलापूर : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. नाताळ, दत्त जयंती आणि नववर्षाच्या सलग सुट्ट्या आल्यानं या काळात स्वामी भक्तांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरलने थैमान घातलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


२४ डिसेंबरच्या मध्यरात्री पासून २ जानेवारी २०२१ च्या मध्यरात्री पर्यंत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान बंद ठेवण्यात येणाराय. या कालावधीत स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाकरता मंदीराकडे येण्याचे टाळावे, असं आवाहन मंदिर समितीनं केलं आहे.


दरम्यान राज्यात कोरोनाचे ३ हजार ४३१ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात १ हजार ४२७ जण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४.४ टक्के इतकं झालं आहे. आज ७१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण अॅक्टिव्ह केसेसचा आकडा ५६ हजार ८२३ वर गेला आहे.