नायजेरियनकडून बनावट इंस्टाग्राम अकाउंटद्वारे 50 हजाराची फसवणूक
नायजेरियनने एका युवकास 50 हजार रुपयांना गंडवले
जयेश जगड, झी मीडिया, अकोला : मोबाईलच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अकोला जिल्ह्यात अकोट येथे इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट बनवून एका नायजेरियनने एका युवकास 50 हजार रुपयांना गंडवले आहे.
मोबाईलवरून फसवणुकीच्या गुन्हयाचा तांत्रिक तपास करून गुन्हयातील मुख्य आरोपी नामे चिमा स्टेनली अलीगबे या नायजेरीयन व्यक्तीस अकोट शहर पोलीसांनी दिल्लीतून अटक केली आहे. अकोट येथील श्याम भुयार यांच्याशी सारा स्टिव्हन या बनावट नावाच्या इन्टाग्रामवरुन मैत्री केली. दोघे मिळून भारतात व्यवसाय उभारू असा विश्वास संपादन केला.
त्यानंतर पुढे भारतात भेटी करिता येत असल्याबाबतचे विमानाचे टिकट व्हॉटसअॅपवर पाठविले आणि सोबत मौल्यवान भेटवस्तु आणल्या असुन त्याचा टॅक्स भरावयाचा आहे. याकरिता लेशम पोयल नावाचे बँक अकाउंटच्या माध्यमातुन व्यक्तीने फीर्यादी श्याम भुयार यास त्याने दिलेल्या खाते क्रमांकावर वेळोवेळी पैसे टाकण्यास सांगून फीर्यादीची 50 हजारांची फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे समजताच भुयार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. सदरचा गुन्हयाच्या तपासात सायबर पोलीस स्टेशन अकोला यांची मदत घेवुन गुन्हयातील मुख्य आरोपी चिमा स्टेनली अलीगबे याचा दिल्ली येथे जावुन शोध घेतला तो दिल्लीच्या खानपूर येथील राजु पार्क यांनी केला.
आरोपीस सदर गुन्हयात ताब्यात घेऊन गुन्हयासंबधी चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यांशी संबधीत दोन अॅन्ड्राईड मोबाईल फोन आणि दोन साधे मोबाईल, दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले.
या गुन्हयाचा तांत्रिक तपास सुरु असून आरोपीकडून अशाप्रकारचे मोबाईलचा वापर करून प्रसवणुक केल्याचे अनेक गुन्हयाची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.