जयेश जगड, झी मीडिया, अकोला : कोरोनामुळे श्रमिकांपासून श्रीमंतापर्यंत सर्वच आर्थिक संकटात आलेयत. आर्थिक संकटाच्या काळात मुलीचं लग्न म्हंटल की डोक्यावर डोंगर कोसळण्यासारखं असतं मात्र लग्नाचा काहीसा भार अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या हॉटेल मराठाच्या मुरलीधर राऊत यांनी कमी केलाय. लग्न, साखरपुड्यासाठी आपलं हॉटेल निशुल्क उपलब्ध करून दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अनेक सामाजिक उपक्रमात राऊत यांचा सहभाग असतो. कोरोनाच्या संकटात त्यांचे ग्राहक असणारे व नसणारे सर्वांना आर्थिक अडचणीत असाल तरीही आपणास लग्न, सांक्षगंध समारंभ निशुल्क आमच्या हॉटेलमध्ये पार पाडावे असे आवाहन केले आहेय. 


कार्यक्रमासाठी राऊत यांनी आपली हॉटेल निशुल्क उपलब्ध करून दिली आहेय. केवळ पाहुण्यांना जेवन द्यायचे असेल तर त्याचे माफक शुल्क ते आकारत आहोय.



नुकताच येथे राजेंद्र जोशी यांच्या कन्येचे लग्न पार पडलं. जोशी हे धान्याची मध्यस्थी करतात. कोरोनामुळे त्यांची ही आर्थिक स्थिती नाजूक झाली. मुलीचं लग्न कसं करावं हा त्यांच्यासाठी मोठा प्रश्न होता. कारण कोरोना संकट काळात आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामूळे इच्छा असुन देखील आपल्याला लाँकडाऊनमुळे घरच्या घरी लग्न संमारंभ पार पाडावा लागतो की काय असा प्रश्न त्यांच्या समोर होता.


मात्र त्यांनी राऊत यांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल ऐकलं आणि मुलीचा लग्न आज त्यांनी येथे पार पाडला. आता पर्यंत या हॉटेलमध्ये तीन लग्न लावण्यात आलंय. आणि पुढे चार लग्न लागणार आहेत.  शासनाने लाँकडाऊन नियमांचे पालन करून आणि आवश्यक त्या परवानग्या घेणे हे अनिवार्य केलंय. चांगली व्यवस्था झाल्याने वधूपिता राजेंद्र जोशी खूप आनंदी आहेत. 


मुरलीधर राऊत यांचा हा उपक्रम आपले संस्कार आणि वैभवशाली परंपरेला उजागर करणारा आहेय. अलीकडे कुटुंब आणि परिवाराची व्याख्या छोटी होत असतांना मुरलीधर यांनी आपल्या सेवेच्या रूपातून आपल्या ग्राहकांसाठी उभी केलेली ही 'अन्नपूर्णा' निश्चितच अभिनंदनीय अशीच म्हणावी लागेल. 



अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील हॉटेल मराठा आपल्या सामाजिक कार्यासाठी अनेकदा प्रकाशात आली आहेय. ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात प्रचंड खळबळ उडाली होती. या निर्णयाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक संकटांना सामोरे जावे लागलेय.


अनेक जणांना राहण्यापासून खाण्या-पिण्याच्या प्रश्नांना सामोरे जावे लागलेय..मात्र राऊत यांनी ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा असणाऱ्या ग्राहकांना भरपेट जेवण दिले. अन बिलाचे पैसे पुढच्या प्रवासात कधीही द्या अशी सूट दिली. यानंतर या कार्याचा नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमात उल्लेख केला होता.