अकोला जिल्हा कारागृहातील ५० कैद्यांना कोरोनाची लागण
आज दिवसभरात ७८ लोकांना कोरोनाची लागण
अकोला : जिल्हा कारागृहातील ५० कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर इतर २८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अकोल्यात आज दिवसभरात ७८ कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. या अगोदर १८ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
जिल्हा कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कारागृहात आतापर्यंत ३०० कैदी आहेत. कोरोनाच्या काळात कोणत्याही नव्या कैद्याला कारागृहात आणण्यात आलेलं नाही.
सरकारी मेडीकल कॉलेज आणि रूग्णालयातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी ७८ लोकांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. ज्यामध्ये ५० जिल्हा कारागृहातील कैद्यांचा समावेश आहे.
अकोला जिल्ह्यात कोरोना रूग्णांचा आकडा १४९८ पर्यंत पोहोचला आहे. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ७६ लोकांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
या अगोदर २४ जून रोजी जिल्ह्यात १८ कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. अकोला जिल्ह्यात ३७८ कोरोनाची ऍक्टिव केसेस आहेत. आतापर्यंत १००० हून अधिक नागरीक कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. आज ही राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात राज्यात आज ५४९३रुग्णांची वाढ झाली आहे. तर २३३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात 86,575 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ७०,७६७ रुग्णांवर रुग्णालयाचत उपचार सुरु आहेत.
राज्याच आज १५६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. ज्यापैकी ६० मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत. तर इतर ९६ मृत्यू हे मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यात मृत्यूदर ४.५१ एवढा आहे. राज्यातील रिकव्हरी रेट आता ५२.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे.