Akola  Lok Sabha Election Results 2024 Live :  अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांचा सपशेल पराभव झाला आहे. भाजपचे अनुप धोत्रे विजयी झाले आहेत. काँग्रेचे डॉ.अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा त्यांनी पराभव केला आहे. अनुप धोत्रे यांनी भाजपचा बालेकिल्ला राखला  आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकाश आंबेडकर यांना  महाविकास आघाडीसोबतच्या वादाचा फटका बसल्याची चर्चा रंगली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि वंचित बहूजन आघाडीत तिरंगी लढत झाली.  भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर हे तिघे निवडणुकीच्या रिंगणात होते.


महाविकास आघाडीतून वंचित बहूजन आघाडीने बाहेर पडत आपल्या उमेदवारांची घोषणा केली होती. जागावाटपाचं गु-हाळ लांबल्याने प्रकाश आंबेडकरांनी मविआला सोडचिठ्ठी दिली. तरीही वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला दोन जागांवर पाठिंबा दिलाय. यात नागपूर आणि कोल्हापूरचा समावेश होता. मात्र, तरीही अकोल्यात काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात उमेदवार दिल्याने या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला.