नितेश महाजन, झी मीडिया, संभाजीनगर : शिंदे गट आणि ठाकरे गट अजूनही त्यांचे आरोप प्रत्यारोप चालू आहेत. अशातच बाळासाहेब थोरात  यांनी एक विधान केलं आहे. बाळासाहेब थोरात हे नेहमीच त्यांच्या विधानामुळे चर्चेत असतात. शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेले सर्व आमदार नैराश्यात असल्याचा गौप्यस्फोट बाळासाहेब थोरात यांनी केलाय. थोरात यांनी आज संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला. (All the MLAs who left the Shiv Sena and joined the Shinde faction are depressed  Balasaheb Thorat nz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


हे ही वाचा - चक्क पोलिसांच्या खुर्चीवर बसून बनवले रिल्स... व्यावसायिकाला पडलं महागात



राज्य सरकार मधील अनेक खाते रिकामे असून सरकारमध्ये सगळा गोंधळ आहे. राज्याचे प्रकल्प पळवून नेले जातायत. सगळीकडे अतिवृष्टी होऊन पिकं हातातून गेललीयत. सरकार मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे तिजोरीत पैसा नाही असं राज्य सरकारने जाहीर करावं असंही ते म्हणाले.राज्य सरकारमधील मंत्र्यांमध्ये जनतेसमोर जाण्याची ताकद नाही त्यामुळे राज्यपालांनी राज्यातील परिस्थिती केंद्रासमोर मांडावी अशी मागणीही त्यांनी केली.


 


हे ही वाचा - इन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांचा हैदोस, तरुण आले जोशात अनं...पाहा हा VIDEO



आम्ही दही हंड्या फोडायच्या आणि यांनी प्रकल्प पळवायचे असा खेळ सुरू असल्याची टीका देखील त्यांनी केली. राज्यात पंचनामे करण्यासाठी लाच मागितली जात असल्यानं राज्यातील परिस्थितीकडे मंत्र्यांनी लक्ष द्यावं असंही ते म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांच्यावर भारत जोडो यात्रेच्या नियोजयाबाबत टीका केली यावर उत्तर देत मला याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलावं लागेल असंही ते म्हणाले. 


 


हे ही वाचा - रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील वाद म्हणजे... अमोल मिटकरी यांची पहिली प्रतिक्रिया



राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 11 दिवस महाराष्ट्रात राहणार असून 7 तारखेला ही यात्रा नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे दाखल होईल असं सांगत राहुल गांधी यांच्या राज्यात 2 सभा होतील असंही ते म्हणाले. या यात्रेत सहभागी होण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रित केल्याच बाळासाहेब थोरात म्हणाले.