`हे आरोप केवळ राजकीय हेतूनं`, नवाब मलिकांनी लावलेले आरोप NCB अधिकाऱ्यांनी फेटाळले
नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे आणि राजकीय हेतूनं असल्याचं NCB च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
मुंबई : आर्यन खानला ड्रग्स प्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. ड्रग्स प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईचे राजकीय पडसादही उमटल्याचे पाहायला मिळाले. या सगळ्या चर्चांनंतर आता NCB अधिकारी समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. समीर वानखेडे म्हणाले की, NCB निष्पक्ष संस्था आहे. ही संस्था नशा मुक्तीसाठी ही संस्था काम करते. ही संस्था मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळून त्या आधारे काम करते.
समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार शिपवर 8 लोकांना अटक केली, 1 लाख 35 हजार त्यांच्याकडे मिळाले. स्वतंत्र साक्षीदार गरजेचे असतात मात्र त्यांची माहिती घेणं कठीण असतं. भानुशाली आणि गोसावी हे दोन साक्षीदार होते, या दोघांना NCB आधी ओळखत नव्हते. त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना NCB कार्यालयात आणलं गेलं.
आरोपींना कायदेशीररित्या वागणूक दिली. आरोपींच्या वकिलांनी कोर्टात हे कबूल केलं आहे. 14 पैकी 8 जणांना अटक, 6 जणांना पुराव्याअभावी सोडण्यात आलं आहे. घटनेच्या ठिकाणी पंचनामा तयार केला जातो. येत्या काळात सर्व कागदपत्रे सादर करणार. NCB अटक केलेले आरोपी आर्थर रोड आणि इतर विविध कस्टडीमध्ये आहेत.
नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे आणि राजकीय हेतूनं असल्याचं NCB च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे NCB च्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिका यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.