अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : कोरोनामुळे (Corona) मृतदेहांची होत असलेली अवेहला आपण सर्वजण पाहतोय. अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणा गाफील राहील्याने रुग्ण आणि मृतदेहांचे हाल होतायत. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात (Amaravati Super Speciality Hospital) कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (Corona Possitive Patient) रुग्णालयातून गायब झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्याचा मृतदेह हा शहरात एका ठिकाणी आढळल्याने खळबळ उडाली आहे. यावरून आपली आरोग्य यंत्रणा किती बेजबाबदार आहे याचं हे जिवंत उदाहरण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती जिल्ह्यातील आजनगाव येथील 65 वर्षीय किसन झोरे नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 23 तारखेला भरती करण्यात आले होते. हा रुग्ण 25 एप्रिल रोजी दुपारी 3 ते साडेतीन वाजता अमरावती शहरातील सिद्धार्थनगर परिसरात पोलिसांना मृतावस्थेत आढळला. 



पोलिसांनी पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद केली. काल नातेवाईकांनकडून ओळख पटल्यानंतर हा रुग्ण पॉझिटिव्ह वार्डमध्ये असताना बाहेर कसा आला ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. नातेवाईकांकडून ओळख पटल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


अमरावती जिल्ह्यातील आजणगाव येथील 65 वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी अमरावती येथील सुपर स्पेशालिटी येथे 23 एप्रिल रोजी भरती केले. त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू झालेत. 


24 एप्रिल रोजी हाच रुग्ण अमरावती शहरातील गडगेनगर पोलीसांच्या हद्दीत असलेल्या सिद्धार्थनगर परिसरात मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदन गृहात पाठविला. 


25 फेब्रुवारीला नातेवाईकानी ओळख पटविल्यानंतर हा रुग्ण हा पॉझिटिव्ह असून सुपर स्पेशालिटी येथे उपचार घेत असल्याचे पोलिसांना सांगितले. यावरून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय.


रुग्णाची सर्वस्वी जबाबदारी रुग्णालयाची असताना रुग्ण अशाप्रकारे हरवत होत असेल तर याची जबाबदारी कुणाची ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात निष्काळजी करणाऱ्यांवर आता काय कारवाई होणार ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.