व्हिडिओ : पाणीप्रश्नाच्या बैठकीत आमदार यशोमती ठाकूर यांची जीभ घसरली
अमरावती जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे यात वर्धा नदी पुर्णपणे आटल्याने अपुरा पाणीपुरवठा होत आहे
अमरावती : दुष्काळाच्या मुद्द्यावरून तिवसा मतदार संघातल्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी रूद्रावतार धारण केला. अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारताना प्रचंड आरडा-ओरडा करत अनेक अपशब्दही वापरले. त्यामुळे त्या वादातही सापडल्यात.
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी ठिय्या आंदोलन केलं. अप्पर वर्धा धरणातून रविवारी वर्धा नदीत पाणी सोडण्यात येणार होतं. मात्र, भाजपा आमदारांनी याला स्थगिती दिल्याचा आरोप आमदार ठाकूर यांनी केला. या पाण्यामुळे अमरावती जिल्ह्यातील काही गावांच्या पाण्याचा प्रश्न काही दिवसांपुरता सुटणार होता. मात्र, श्रेयवादातून प्रशासनावर दबाव आणून भाजपा आमदारांनी स्थगिती आणल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. तर अप्पर वर्धा धरणातून पाणी न सोडल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिलाय.
पाण्याचा प्रश्न गंभीर
अमरावती जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे यात वर्धा नदी पुर्णपणे आटल्याने अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी रविवारी वर्धा नदीला पाणी सोडण्यात येणार होते. त्यामुळे तिवसा, धामणगावसह अनेक गावांचा पाणी प्रश्न तात्पुरता सुटणार होता. मात्र ऐेनवेळी याला भाजपच्या आमदारांने स्थगिती दिल्यानं प्रशासनावर दबाव आणत श्रेयवादातून अप्पर वर्धा धरणाच्या पाणी सोडण्याला स्थगिती दिल्याचा आरोप आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलं.
पूर्वीच्या निर्देशानुसार आधी धरणातून पाणी सोडावे व नंतरच चर्चा करायची, असा पविञा घेत आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.