दोघांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला पकडण्यात अपयश
चंद्रपूर जिल्ह्यातील औष्णिक वीज प्रकल्प परिसरात जन्मलेला हा वाघ आहे.
अमरावती : आठ दिवस उलटले तरी अमरावती जिल्ह्यातल्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात वन विभाग सपशेल अपयशी ठरलाय. या नरभक्षक वाघानं धामणगाव आणि तिवसा तालुक्यात आतापर्यंत दोघांचा बळी घेतला असून, पाच जनावरांचा फडशा पाडलाय. त्याला पकडण्यासाठी वन विभाग जंग जंग पछाडतंय. मात्र अजून तरी त्याला पकडण्यात यश आलेलं नाही.
दहशतीमुळं शेतीची कामं ठप्प
गेल्या दोन दिवसांपासून या नरभक्षक वाघानं तिवसा तालुक्यातील शिवारात मुक्काम ठोकला असून चार गाईंची शिकार केलीयं.
चंद्रपूर जिल्ह्यातील औष्णिक वीज प्रकल्प परिसरात जन्मलेला हा वाघ आहे.
त्याला जंगलात राहून वन्य प्राण्यांची शिकार करण्याचा अनुभव नसल्यामुळं हा शेतामध्ये आणि मानवी वस्त्यांच्या परिसरामध्ये राहून शिकार करतोय.
त्याच्या दहशतीमुळं शेतीची कामं ठप्प पडली असून, नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.