अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: हल्ली चोरीच्या घटना अनेक ठिकाणी वाढू लागल्या आहेत. आपल्या कोणत्या गोष्टी कधी चोरीला जातील याचा काहीच थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या वस्तू जपून ठेवणे खूप बंधनकारक होऊन जाते. सोने दागिने तर सोडाच परंतु आता चक्क चपला, सिलेंडरही चोरी होऊ लागले आहेत. त्यातून नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेतून समोर (crime news amravati) येते की सध्या बाईकही चोऱ्या होऊ लागल्या आहेत आणि आता या बाईक चोरी करून त्या विकण्याच्या पद्धतीलाही चोरीच्या बुद्धीला दाद द्यावी लागले असंच या घडल्या प्रकारातून समोर येते आहे. या चोरानं बाईक कुठे लपवल्या हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. (amaravati news a man tries to steal bikes and hides inside crater in a jungle)


चोराची कामगिरी पाहा तरी... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या चोरीच्या घटना (bike stealing) अनेक ठिकाणी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे अनेकदा सगळीकडे चिंतेचे वातावरण असते. अल्पवयीन मुलांच्या सहकार्याने दुचाकी चोरायची व त्यानंतर तिचे सुटे भाग करून ते भंगार विक्रेता व इतर ठिकाणी विकायचे यात हातखंडा असलेल्या एका आरोपींला पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. मोठ्या प्रमाणात दुचाकींचे सुटे भाग विकल्याचा प्रकार या घटनेने पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे यातील दुचाकी अमरावती जिल्ह्यातील हत्तीघाट परिसरातील जंगलात लपवून ठेवल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. जंगलामध्ये आरोपींनी असंख्य दुचाकी चोरून त्याचे भाग वेगवेगळे करून जंगलातील खड्ड्यात पुरून ठेवले. त्यात क्रमांक खोडलेले तीन इंजिन, चार चेचीस, आठ इंजिनसह असणारे चेचीस, सात सायलेन्सर, सहा मडगार्ड, दहा शॉकअप, सात रिंग (टायरसह), एक पेट्रोल टाकी, एक ब्रेकपट्टी, दोन बॅटरी असा सुमारे 3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


टेम्पोला अपघात 


खोपोली शिळफाटा इथं पहाटेच्या सुमारास झाडाला ठोकल्याने टेम्पोला भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त टेम्पोचा चालक अस्वान मुस्तफा केबिनमध्ये अडकून पडला होता. मदत यंत्रणांनी क्रेन, हायड्रॉलिक कटर यांच्या सहाय्याने त्याला बाहेर काढले. गंभीर जखमी चालकावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.