मांसाहारी प्रेमींसाठी चवदार बातमी, प्रयोगशाळेत मटण तयार
मांसाहारी प्रेमींसाठी एक चवदार बातमी. प्रयोगशाळेत मटण (laboratory meat) तयार केले आहे.
योगेश खरे / नाशिक : मांसाहारी प्रेमींसाठी एक चवदार बातमी. पुढच्या काही दिवसात मटण खाण्यासाठी प्राणीहत्या करण्याची गरज भासणार नाही. कारण एका अमेरिकन कंपनीने (American company) प्रयोगशाळेत मटण (laboratory meat) तयार केले आहे. प्राण्यांच्या पेशीपासून हे मटण तयार करण्यात आले आहे.(Lab-Grown Meat Product) आणि हे मटण आता बाजारात विकण्यासही सुरुवात झाली आहे. काय आहे या मटणाची खासियत.
तुम्हाला मटणाच्या वेगवेगळ्या डिशेश खायच्या असतील तर तुम्हाला मटण मार्केटमध्ये जायची गरज नाही. येत्या काळात मटणाच्या दुकानासमोर रांगेत उभं राहण्याचीही गरज नाही. कारण आता मटणच प्रयोगशाळेत तयार होणार आहे. ईट जस्ट या अमेरिकन कंपनीने प्रयोगशाळेत तयार केलेल्या मटणाला सिंगापूर (Singapore) सरकारने विक्रीसाठी परवानगी दिली.
प्राण्यांच्या पेशीपासून हे मटण प्रयोगशाळेत तयार होणार आहे. प्रयोगशाळेत मटण तयार होणार असल्याने प्राणीहत्या होणार नाही. प्राण्यांना मारण्यामुळं पर्यावरणाचं संतुलन बिघडणार नाही. २०५० पर्यंत प्रयोगशाळेतील मटणाची मागणी ७० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.
प्रयोगशाळेतल्या मटणामुळं मांसाहाराची इच्छाही पूर्ण होणार आहे. शिवाय मटणासाठी प्राणीहत्या केली असेल याची सलही मनाला बोचणार नाही. त्यामुळे पाहताय काय करा ऑर्डर.