अमित शहा शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिणार
गुजरातेत शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचे चित्र आहे, हे चित्र बदलण्यासाठी गुजराती भाषेत पुस्तक लिहिणार असल्याची माहिती सहस्त्रबुद्धे यांनी दिली.
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास गुजराती भाषेमध्ये, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाहा हे लिहिणार आहेत, अशी माहिती भाजपाचे उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली.
भाजप अध्यक्ष अमित शहा लिखित आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रकाशित ‘भारतीय जनता पार्टी राजकारण कशासाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन आज बालगंधर्व रंग मंदिरात करण्यात आले.
गुजरातेत शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचे चित्र आहे, हे चित्र बदलण्यासाठी गुजराती भाषेत पुस्तक लिहिणार असल्याची माहिती सहस्त्रबुद्धे यांनी दिली.
महाराजांचा खरा इतिहास गुजरातमधील जनतेसमोर यावा, यासाठी शहा हे मराठ्यांच्या इतिहासाचा गेली ६ महिने अभ्यास करत आहेत. आजवर गुजरातमध्ये शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली, इतकीच त्यांची ओळख असल्याचे चित्र रंगवण्यात आलं आहे. तसेच याबद्दल अनेक समज गैरसमज देखील पसरले आहेत .
'भाजपा राजकारणात कशासाठी', या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार विनय सहस्त्रबुद्धे हे उपस्थित होते.