अकोला :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती अकोल्याचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांची प्रकृती अचानक बिघडली. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विदर्भ अध्यक्ष सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांचा विदर्भ दौऱ्या निमित्त अकोल्यात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. (Amol Mitkari NCP MLA get collapsed on Stage during Speak in Akola ) यावेळी भाषण करत असताना आमदार अमोल मिटकरी यांची तब्बेत अचानक बिघडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी वृद्ध कलावंत अनुदान समिती त्वरित मार्गी लागावी याकरिता शासन दरबारी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या दरम्यान मिटकरी यांनी आपल्या भाषणातून अनेक लोक गीत आणि पोवाडे गाऊन उपस्थितांकमध्ये उत्साह निर्माण केला. या नंतर मिटकरी यांना अचानक उच्च रक्तदाबचा त्रास जाणू लागला आणि त्यांची प्रकृती बिघडली.


या नंतर त्यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी म्हंटलंय. अमोल मिटकरी यांनी देखील आपली प्रकृती चांगली असल्याचं म्हंटलं आहे. अमोल मिटकरी यांच्या प्रकृतीत सुधारणा असून चिंता करण्यासारखे काही नाही. स्वतःचा जीव धोक्यात घालून मला भेटायला येवू नये अशी विनंती अमोल मिटकरी यांनी कार्यकर्ते व मित्रांना केली आहे. 


अमोल मिटकरींना भजन-किर्तनाची आवड 


अमोल मिटकरी हे अकोल्याच्या अमरावती सीमेवर असलेल्या कुटासा या गावचे. वडिलांची समाजसेवेची आवड अमोल मिटकरी यांनी जपली होती. त्यांच्याकडे दोन एकर शेती होती आणि किराणा दुकान होते. तसेच त्यांच्या कुटुंबावर गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रचंड प्रभाव होता.  मिटकरींना लहानपणापासून भज किर्तन यात रस होता. गावागावात ते भजन-किर्तनातून संतांचे विचार पोहोचवत असत. त्यातूनच वक्ता म्हणून ते सगळ्यांसमोर आले.