Maharastra Politics: मिटकरी म्हणतात `शिंदेंचा घात झालाय`, अजित पवार मुख्यमंत्री होणार?
Amol Mitkari On Eknath Shinde: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कुटुंबियांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते `व्यक्तीगत निर्णय` घेतील, अशी शक्यता देखील निर्माण झाल्याने आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा संशयाची सुई आल्याचं पहायला मिळतंय.
Amol Mitkari: गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात (Maharastra Politics) अस्थिरता निर्माण झाल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आणि दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हालचालींना वेग आला. तर शिंदे गटाचे नेते, राष्ट्रवादीचे नेते यासारख्या अनेक राजकीय नेत्यांनी राज्यात पुन्हा सत्तांतराचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता सर्वांच्याच भूवया उंचावल्याचं पहायला मिळतंय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.
सामन्याच्या रोखठोकमध्ये आज संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कुटुंबियांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते 'व्यक्तीगत निर्णय' घेतील, अशी शक्यता देखील निर्माण झाल्याने आता अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा संशयाची सुई आल्याचं पहायला मिळतंय. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची जागा घेण्यासाठी अजित पवार तयार आहेत. त्यामुळे आता अजित पवारांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होणार का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.
काय म्हणाले Amol Mitkari ?
सर्वांच्या मनात धाकधूक निर्माण होत असल्याने अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून मोठी खळबळ उडवून दिली. भाजपकडून आपला आणि आपल्या सहकाऱ्यांचा राजकीय घात झालाय, हे आता एकनाथ शिंदे यांना कळून चुकलंय, असं अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणतात. मला शिंदे गटातील माझ्या एका आमदार मित्राने अशी माहिती दिलीये, असंही त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
पाहा ट्विट -
दरम्यान, अजित पवार यांना प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि सुनील तटकरे (Sunil Tatakare) यांचा पाठिंबा असल्याने अजित पवार वेगळी भूमिका घेतील, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. मात्र, पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नसल्याचं शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सांगिलंय, असं संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात काय होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.